जेव्हा पासून पहिलय तुला....

जेव्हा पासून पाहिलंय तुला
मनात माझ्या रुज्लीस तू,
एकाच क्षणात ह्या नजरेनी
अशी काय जादू माझ्यावर केलीस तू ?
सूर्य उगवून कधी मावळतो
काहीच आता कळत नाही,
तुला समोर पाहिल्यावर
नजर तुझ्यावरून वळत नाही ...
प्रत्यक्षात तुला भेटण्या साठी
पहाट होण्याची वाट पाहतो मी,
भेटल्या वरही फक्त
तुलाच पाहत राहतो मी ...
अशी कशी हि नशा
जी डोळ्यातून माझ्या उतरत नाही,
तुला समोर पाहिल्यवर
नजर तुझ्यावरून वळत नाही ...
रात्रीच्या अंधारात जेव्हा
एकांतात बसलो असतो मी,
तुझी आठवण आल्यावर
हळूच गालातल्या गालात हसतो मी ...
इतका प्रेमात कधी तुझ्या पडलो
माझं मलाच काही कळत नाही,
तुला समोर पाहिल्यावर
नजर तुझ्यावरून वळत नाही !!

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments