स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे

वीर छावा तो शिवाचा देश रक्षणी जन्मला
दिला मात त्याने मृत्युला जना मना तो रुजला
ना नमला तो ना झुकला तो
विजय घेण्यास तो झुंजला
ना तो हरला ना तो थकला
धोक्यात तो फसला
अखेरिचा श्वास ही त्याने स्वाभिमानाने घेतला
होता जेव्हा मृत्युचा मुखात
होता तेव्हा ही आईवर मान
गर्व होतो त्याला मातीवर
लढला त्यासाठी जिवावर
अखेरिला शत्रुस ही नमवले
स्वता चरनी औवरंग्यास झुकवले
रचला त्याने इतिहास
उठऊन भगव्याची शान
वाढऊन महाराष्ट्राचा मान
जय भवानी जय शिवाजी
जय हो छत्रपती शंभू राजाची......

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments