शिवराय राज्यअभिषेक सोहळा.....

जना मनात रुजलेले माझे राजे
सत्याचे आहे साक्षात्कार
राज्य अभिषेक सोहळा त्यांचा
करुया जलोश आणि जय-जय कार!!

रक्ताळलेल शहर हे होत
होता जिथे-तिथे हाहाकार
देव बनुनी ते जन्मले
केला धर्माचा उद्धार!

माणुसकीला प्रथम धरुनी
केला सगळ्यानचा कल्याण
शब्द हे सारे त्यांना अर्पितो
करतो मी हे गानोगान!!

प्रतेकाला समान समजूनी
लावला निष्कर्ष सगळ्यानचा ठेऊनि मान!!

राजे माझे माहान होते
होते ते हृदय सम्राट
हिन्दवी स्वराज दर्पण
ठेवले त्यांनी धेय विराट!!

करुण दाखवले ते-ते त्यांनी जे ना जमले कोणास
माता जीजाऊचा पोटी आले
बनले या महाराष्ट्राची शान
मातीला या माता मानुनी
लढले तिच्या समांनास!!

घडवण्यास इतिहास
फिरले सह्याद्रीचा दऱ्या खोऱ्यात
आज जे आहो आम्ही
आहे राजेंचे उपकार!!

करतो मुजरा त्यांना वाकुनी
म्हणतो मी दोन शब्द महान
जय भवानी जय शिवाजी!
जय माता जीजाऊ!!

(शुभम सोनकुसरे)

Post a Comment

0 Comments