अमावस्येची रात्र

अस्ताला सुर्य गेला,
आभाळ झाले रिकामे,
रात्र ही  अमावस्येची ,
ना चंद्र ना चांदणे,

अंधार भरला सभोवती ,
मार्ग ही हरवून गेला ,
काजव्यांनी साथ सोडली,
घाव दिले काट्याने ,

चाहूल लागते  शेजारी,
आहे कुणी सोबतीला,
भास असे अस्तित्वाचा ,
मन ग्रासले  निराशेने,

साद कुणाला द्यावी  ,
कुणी नसे साथीला ,
सारे काही हरवून गेले ,
ऊरले अंधारी जगणे....

(शुभम सोनकुसरे)

Post a Comment

2 Comments