धर घट्ट हात माझा.....

असाचं धर घट्ट हात तु माझा
कधीच सोडू नकोस हात तु माझा
डोळ्यांत अश्रु तरळतात गं माझ्या
जेव्हा नसतो मला सहवास तुझा...

डोळ्यासमोर रहा तु आता आयुष्यभर माझ्या
प्रत्येक क्षणी हवीस तु आता जवळ माझ्या
विरहात तुझ्या जळतो गं जीव माझा
तरफडणा-या माझ्या ह्रदयाला दे तु सहारा...

वाटेवरी उभा राहून पाहतो मी वाट तुझी
येशील एकदातरी तु अन,
पाहशील मला अशी आस माझी
गुपचूप आणी लपून राहतो
मी आता त्या निरागस वाटेवरी...

नेहमी असतो मी त्या शब्दांच्या शोधात
ज्यात लिहू शकेल मी प्रेमाला माझ्या..
स्पर्श करायचाय मला ह्रदयाला तुझ्या
आता शब्दांनी माझ्या
आणी ते शब्द शोधून
एक दिवस दाखवेलं मी तुला बग तु आता...

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments