आज पुन्हा

आज पुन्हा जगण्याचं वेड आहे...
आज पुन्हा लढण्याचं बळ आहे...
नको जाऊ मध्येच सोडुन
तुझ्याशिवाय अधुरा माझा खेळ आहे...
मांड एक डाव आज पुन्हा
लपंडाव नको होऊ देऊ
तुजवर विश्वास आहे...
घर की आंगण तुझे न माझे
हा संसार सगळा
आपला एक मेळ आहे...

(शुभम सोनकुसरे)





Post a Comment

1 Comments