रांजणगावाचा गणपती (अष्टविनायक -८)

घेऊन दर्शन महागणपतीचे

संपन होते अष्टविनायक दर्शन

पावतो रांजणगावाचा महोत्कट

राजा सारखा शोभतो विनायक


त्रासली जेव्हा धरा त्रासाने

हुडदंग केला त्रिपुरासूराने

वर दिले होते स्वतः गजाननाने

फसले सगळे त्या वराने


फक्त अंत होणार शंकराचा हाताने

मागितले होते वर त्याने

बघून त्याचे असले कर्म

सांगितले शंकराला गजाननाने


अंत केला त्रिपुराचा शंकराने

महागणपतीच्या मार्गदर्शनाने

धन्य झाली बघून धरा हे दृश्य

सुख पसरलं त्रिपुराच्या अंताने


स्थापन स्वतः केलं शंकराने

पुजल सगळ्या देवाने 

दहा सोंडेचा महागणपती

वीस हाथ आहे देवाचे


आज पुजतो त्याला भक्त प्रेमाने

चमत्कारी मूर्ती रांजणगावाची

विराट आहे स्वरूप देवाचे


(शुभम सोनकुसरे)

Mahaganpati-ashtvinayak
महागणपती



Post a Comment

0 Comments