फक्त तिलाच तर कळते.....

फक्त तिलाच तर कळते
काय तुझी व्यथा
मनातलं लिहिलं तरी
लोकांना वाटते कथा

झाकुन घेते ती
अंतरीचं सगळं
व्यक्त होऊन असं
मन होतं मोकळं

कधी असते कल्पना
कधी असते जाणीव
कवितेत मात्र भावनांची
पडत नाही उणीव

(शुभम सोनकुसरे)




Post a Comment

0 Comments