माझीच तू.....

माझी हार तू,
माझी जित तू,
माझी प्रित तू,
हो... माझीच तू...!!

मन वेडा मी अन् प्रित माझी तू,
ओठांवरी माझ्या गीत आहेस तू...!!

कधी जवळ,
कधी दुर,
कधी प्रेमात आनतेस पुर,
माझाच ध्यास तू,
माझीच आस तू,
हो... माझीच तू...!!

कधी बावरी माझ्या भेटीत तू,
कधी लाजरी माझ्या मिठीत तू...!!

कधी सावली,
कधी ऊन,
कधी रिमझिम पाऊस बनून,
माझ्यात वास तू,
माझ्यात श्वास तू,
हो... माझीच तू...!!

मनात तू, ह्रुदयात तू,
नसानसातल्या रक्तात तू...!!

माझाच जिव तू,
माझाच प्राण तू,
माझीच तू,
हो... फक्त माझीच तू...!!

(शुभम सोनकुसरे)





Post a Comment

0 Comments