तु आणि मी

मी शब्द सारं होतो
तू कविता हो ना गं!
मी कागद होतो
तू टाक हो ना गं!!

मी तो वेळ होतो
तू लुप्त सांज हो ना गं!
मी प्राण होतो
तू हृदयाचे ठोके हो ना गं!!

मी निखळलेला वृक्ष
तू वेल वेडी हो ना गं!
मी स्पर्श नाजूक होतो
तू सुंदर कळी हो ना गं!!

मी सोसाट्याचा वारा
तू वावटळ हो ना गं!
मी आडोसा होतो
तू वेडी झुळूक हो ना गं!!

मी काठ पदराचा होतो
तू नक्षीदार साडी हो ना गं!
मी नक्षीदार दार होतो
तू सजलेली रांगोळी हो ना गं!!
     
✒: (शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments