चांगल वाटतं

माझ स्वप्नांशी वैर नाही,
पण रात्रीच जागण चांगल वाटतं!
माझ हसण्याशी पण वैर नाही,
पण कधी-कधी रडणं चांगल वाटतं!
तस तर खर तुटलेल तर काहीच नाही,
पण काहीतरी वेचत रहाणं चांगल वाटतं!
माहीत नाही...
मला हक्क आहे की नाही,
पण सततं तिची काळची करण चांगल वाटतं!
मनातली ईच्छा पुर्ण होईल की नाही,
पण तिला देवाकडे मागत रहाण चांगल वाटतं!
तिच्यावर प्रेम करण बरोबर आहे की नाही,
पण ही भावना जपत रहाणं चांगल वाटतं!
माहीत नाही...
ती माझी आहे की नाही,
पण तिला फक्त स्वतःच समजनं चांगल वाटत!
ती नशीबात आहे की नाही,
पण तिच्या आठवणीत जगणं चांगल वाटतं!
माहीत नाही...
ह्या भावना कधी संपतील की नाही,
पण रोज तिच्या विरहामुळे मरणं चांगल वाटतं!
माहीत नाही का?
समजवलं तरी समजत नाही,
बहुतेक हृदयाला देखील फक्त,
तिच्यासाठी धडधडणं
चांगल वाटतं. . .

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments