कळी होती आधी

अंकुरातुन अस्तित्व पाउनि
कळी सारखी होती
प्रेमात पडुनी फुल्लेला फुल ती झाली

पहिल्यांदा जेव्हा दृष्टि पडली
कोमल कळी जणू भासली
सर्वस्व मला मानून फ़ुलुन ती निघाली

रात्रो जेव्हा निजली
मृगनयनी अशी ती झाली
डोळ्यात माझा बघुनी हृदय चोर ती झाली

सूर्य उदयास आला
स्वर्ण कमळ ती झाली
एका क्षनात सारा निसर्ग सजऊन गेली

(शुभम सोनकुसरे)



Please visit this link also

https://www.instagram.com/p/B_eLZGIl5vc/?igshid=szx2aikuw1m3

Post a Comment

0 Comments