तुला आठवत असतो!

अंधारात चालताना वाट शोधत असतो,
थोड़ी भीती वाटलीच,
की तुला आठवत असतो!
नकळत दाटलेल धुकं पुसत असतो,
परत त्याच वाटेवर चालत राहत असतो,
तुझ्या भेटीची ओढ़ असते,
तुझ्या मिठीची आस असते,
मनातल्या मनातचं वेड्या मनाला समजावत असतो,
नाहीचं आल समजावता,
तर प्रिये...
तुझी आठवण काढत असतो!
पुन्हा त्याच वाटेवर चालत असतो,
गहिवरून आलेल्या भावनाना
आवर घालत असतो,
दम छटवणाऱ्या श्वासाना
तुझा श्वासात देत असतो,
खुप मिठी मराविशी वाटली की
आकाशाला पाहून मीठी मारत असतो,
खुपच त्रास झाला ना,
मग प्रिये तुझी आठवण काढत असतो.....
तुझी आठवण काढत असतो!!

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments