महाराष्ट्र देशा.....

अहो भाग्य आहे आमचे
जन्म या मातीत झाला!!
या मातीने जन्म दिला
वीर वीर जनांना!!
इथे जन्मला माझा राजा
ज्यांच नाव होत शिवबा..
केल हृदयात राज्य त्यांनी
संम्पूर्ण या देशा!!
इथे जन्मले थोर पुरुष
ज्यांनी झुंज दिली स्वतंत्रात!!
इथे झाला एक छावा
ज्यांच नाव होत वीर शंभू राजा..
शत्रुस त्यांनी झुकवल चरनी या आईचा!!
इथे घेतली त्यांनी दिक्षा
ज्यांनी रचला ग्रंथ संविधान
त्यांच नाव होत डॉ. बाबा साहेब..
रुजले ते जना मनात!!
किती सांगू मी गाथा आईची माझ्या!
ती ना संपणार या जन्मा..
आहे हा इतिहास मोठा !
संम्पवीतो मी ही गाथा बोलून जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा!!

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments