मिटूनी हा दूरावा......

माझी बाहूली हरवली कुठे??
डोळ्यांना काही दिसेना।

शोधून शोधून
वैतागलो मी
पण या डोळ्यांची
आस काही मिटेना।

स्वप्न तर हरवलं
पण क्षणही दूरावले..
कूठेच काही दिसेना
शोधू तरी कुठे-कुठे आता।

समजेनासे झाले
मन हे बावरे होऊनी बसले
तुझ्यासारख्या मनाला
पाहूनी मन हरपले।

हरवली तरी कुठे ती ?
काहीच का समजेना ?
मिटूनी हा दूरावा
काहीच का जाणवेना।

कुठे असेल ती कूणास ठाऊक ?
मनी का ऊमजेना ?
हरवलेली बाहूली
माझ्या डोळ्यांना दिसेना।

शोधूनी झाले चहूकडे
बघूनी झाले तनामनामधे
पण कुठेच का दिसेना।

मी राहू नाही शकत
माझ्या बाहूलीशिवाय
हे तिला अजूनी
का समजेना।

खरंच दिसायलाच नवे तर
अगदी गोड आहे ती बोलायला।
शब्दात तर सांगणे
जमणारच नाही मला।

कितिही दूर असली तरी
ती ह्रदयात आहे मझ्या
कायमची वसलेली ।

दिसेल मला माझी बाहूली
आज ना ऊद्या
बघताच क्षणी,
घट्ट मिठित घेईल मला ।

वाट मी पाहतोय आजही
माझ्या बाहूलीची...
कारण माझ्या बाहूलीशिवाय
मनाची आस काही सम्पेना ।।

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments