फक्त तुझ्यासाठी.....

मी लिहतो आहे कविता,
फक्त तुझ्यासाठी..!

कवितेतील हर एक शब्द,
फक्त तुझ्यासाठी..!

मी कविवेडा झालो,
फक्त तुझ्यासाठी..!

आता हे नयन असतील माझे,
फक्त तुझीच राहं ताकण्यासाठी..!

तरसतील ते फक्त,
तुलाच पाहण्यासाठी..!

प्रत्येक श्वास असेल माझा,
तुझीचं आठवण काढण्यासाठी..!

हा श्वास ही थांबेल कदाचीत,
फक्त तुझ्यासाठी..!

सर्वां पेक्षा मला,
तु खुपचं जास्त आवडतेस..!

मी प्रेम ही शिकलो,
ते फक्त तुझ्यासाठी..!

म्हणुनच माझी कविता,
माझे शब्द,
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी..!

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments