मी तुला आता रोज मिस करतो.....

खूप मिस करतो गं तुला
मी आता रोज मिस करतो...
तुझ्या माझ्या भेटीचे ते क्षण
मी आता रोज मिस करतो...

आयुष्याच्या या वाटेवर आता
खूप पुढ चालत आलोय मी
एकटाच तुझ्या आठवणींना घेऊन
 मी आता तुला रोज मिस करतो...

तुझ्यासाठी असलेले माझे क्षण
नेहमी तुझ्यासाठीचं राहतील
आणी मलाही ते क्षण
फक्त तुलाचं द्यायचे आहेत , आणी त्यासाठी
मी तुला आता रोज मीस करतो...

तुझं मला चिडवणं
तुझं माझ्यावर रागवणं
तुझं विणाकारण रूसणं
तुझं असं हे वागणं
मी आता रोज मिस करतो...

अविस्मरणीय तुझी एक आठवण
आणी त्या आठवणीतील
तु माझं प्रेम...

(शुभम सोनकुसरे)





Post a Comment

0 Comments