प्रेम...एक भावना

प्रेम हृदयातील
एक भावना..
कुणाला कळलेली..
कुणाला कळून
न कळलेली..
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली..
तर
कुणी आयुष्यभर
लपवलेली...
कुणी गंमत करण्यासाठी
वापरलेली..
तर
कुणाची गंमत
झालेली..
कुणाचे आयुष्य
उभारणारी..
तर
कुणाला आयुष्यातुन
उठवणारी..
फक्त एक भावना...

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments