खरे प्रेम असावे.....

खरे प्रेम असावे कमळासारखे...
जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्या शिवाय ते कधीच उगवत नाही!
खरे प्रेम असावे गुलाबासारखे...
जे कोमल आणि सुगंधी असले जरीे,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही!
खरे प्रेम असावे आकाशासारखे...
विशाल व विस्तीर्ण...
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे!
कारण…
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही!!

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments