वीर जवान.....

देशासाठी झुंज लढुनी मोल मातीचा फेडला
रक्त गाळुनि आईसाठी मान आईचा राखला
ग्रंथ प्रेमाचा अनोखा त्याने देश प्रेमाने लिहिला
अश्रु देउनी स्वतः विरहाचा देश हा खिलविला!
त्याला ना मरणाची चिंता,
ना हरण्याची भीती,
असा तो शेर छावा लढ़ला!
वीर आहे वीर होता वीरच तो राहला!!
मन एकाग्र करुण जाने रात्र रात्र काढ़ल्या
रणचंडीचे दर्शन त्याने दुश्मनास करवलं
देश राखन्यास देशासाठी सीमेवर तो दटला!
अखेरचा ही श्वास त्याने देशासाठी घेतला
आई रक्षने , पुत्राने श्वास हा घेतला
दुश्मनाला मारुन मग आई मांडित निजला
वीर आहे वीर होता वीरच तो राहला!!

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments