जीवनातून कधी हरुन न जाता.....

जीवनातून कधी हरुन न जाता
झुंज त्रासाला देऊन जगा..
ओझ जर जीवनावर आल
प्रिय व्यक्ति सोबत वाटुन ते बघा..
जीवन संपवण्याचा विचार आल्यास
थोड मागे बघून तर बघा..
आई बाबा बहिन भाऊ
यांचा ही तुम्ही विचार करुण बघा !
त्रास हा क्षणिक आहे
रात्री नंतर सकाळ आहे
फक्त तो वेळ काढायचा आहे
जीवन सुंदर होणारच आहे
इतका विचार करुण जगा..
जीवन हे तुम्ही संपऊ नका !!

(शुभम सोनकुसरे) 


Post a Comment

0 Comments