बाबा(वडिल).....

कष्टाळु त्यांचे आयुष्य असते
काम त्यांची प्राथमिकता
सुखी आयुष्य करण्यास मुलांचे
राबत असतात ते या जगा

त्रास कोणास ते सांगत नाही
आस कशाची ठेवत नाही
घास भरवल्या शिवाय मुलांना
घास स्वता ते गिळत नाही

स्वप्न पूर्तिसाठी मुलांचा
स्वप्न स्वताचे बाळगत नाही
मुलानी जरी सोडले त्यांना
ते मुलास सोडत नाही

माहान अशी व्याख्या बाबाची
माहान त्यांचे कर्म
कोणी नाही घेऊ शकत जागा त्यांची
देव असो की गंधर्व

शब्द बाबा हा फक्त दोन शब्दांचा
अर्थ ना त्यांचा कोणत्या शब्दकोषात
जानण्यासाठी व्हावे बाबा
नाहीतर ना ते कळनार

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments