तुझ्या आठवणींचं छोटसं गाव .......

हे श्वास ,
ही स्पंदनं ,
मृत्यु ही हवा पण तुझ्याच मिठीत .
जगण्याचं बंधन .
हळवे पाश तुझे ,
स्पर्शही रेशमी .
तुझ्या नजरांचे तीर ,
त्यांच अचूक लक्ष्य फक्त मी .
माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका ,
उच्चारतोय तुझचं नाव .
या मनाच्या तळाशीही वसलयं ,
तुझ्या आठवणींचं छोटसं गाव .......

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments