कधी सांजवेळी.....

कधी आठवुनी मला मनाशी
तुझ्या हृदयातुनी जराशी लाजशील,
का?
तुझा एक ईशारा आणि शहारा
शरीरावरुनी हळूच हृदयात माझ्या,
शिरशील का?
राहाते सूर आता
इथे या मनाशी
जीवनभर माझ्या सोबतीला
राहशील का?
तुझ्या आठवनीला साठवतो मी
तु ही मला हृदयाशी साठवशील
का?
कधी सांजवेळी समुद्रा किनारी
एकटी जरा मला भेटशील
का?

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments