निसर्ग.....

फिरता फिरता कधी अचानक डोळे थांबले एकी कडे
सुंदर निरागस दृश्य असे ते मनी भाऊन गेले कसे
रम्य होते मनाशी जसे स्वर्ग उतरले धरा जसे
एकटकानी बघत होतो ते मी असे
जसे चित लागतात देवालयात तसे!

बघुनी त्यास जीवन धेय भेटले मला
भरुन ते घेतले डोळ्यात जसे प्रेम हृदयात
सुंदरता त्या निसर्गाची अशी
जसे परमेश्वराचे ते साक्शात्कार!

ते सुंदर फुल त्यावर सुर्याची किरण
तो पडता झरा त्यात भिजती शिला
त्याला त्या आकाशाची साथ
आणि या धरतीची ती वाट
त्यावर ते मनमोहक वन चहू दिशी फक्त हिरवळ
वेड लाऊन जाणार कोणाचाही मनाला!

प्रेम हे निसर्गाचे सुहाने
मनात नेहमी घर करी
रुजुन जा नयनी ते जाई
भान ना मग कोणाचा राही!

काय सांगू शब्दात मी त्याला
शब्दही अपुरे पडले आता
समजुन घेऊनी साऱ्या त्या भावना
प्रेम तुम्ही ही करा आता!!

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments