ओझरचा गणपती (अष्टविनायक -७)

विघ्न हरणार रूप तुझं देवा

भल्या भल्याचे विघ्न क्षणी हरतो

दुःख त्याला घेरत नाही

साथ जाच्या पाठीशी तुझा असतो.


विघ्न जेव्हा पृथ्वीवर येतो

विघ्नेश्वर रुपात धरेवर प्रकटतो

विनाष साऱ्या दुःखाचं करतो

म्हणून देवाला विश्व विघ्नेश्वर म्हणतो.


ओझर गावाचा विघ्नेश्वर भल सुंदर स्वरूप

विघ्नासुराचा अंतासाठी आल धरा त्याच रूप

अंत दैत्याच करून सगळ्यांना भयं मुक्त केलं

शांती सर्व जागी पसरऊन सुखमय वातावरण केलं.


वीस फुटाचं इथल मंदिर

पूर्वाभिमुख विघ्नेश्वर

डावी कडे वडवलेली सुंड

डाव्या उजव्यास रिद्धी सिद्धी विराजमान.


डोक्यावर फणा घालून आहे नाग

डोळ्यात माणिक बसवलेले

सगळ्यांना त्याचा कृपेने समृध्दी आहे प्राप्त.


मंदिराचा दारावर चार द्वारपाल प्रस्थापित

पहिल्या चौथ्याचा हातात शिवलिंग स्वरूप

आदर आईबाबाचे किती हे ते बघून कडत

बघून हे आदर सगळ्यांच मस्तक प्रेमाने नमत...


(शुभम सोनकुसरे)

विघ्नेश्र्वर-अष्टविनायक
विघ्नेश्वर





Post a Comment

0 Comments