लेण्याद्रीचा गणपती (अष्टविनायक -६)

लेण्याद्रीचा राजा तु देवा
वसला शिवनेरीच्या सानिध्यात
श्री गिरिजात्मज नाव तुझं
महिमा तुझी खूपच विराट

गिरजा म्हणजे माता पार्वती
आत्मज म्हणजे मुलगा
किती सुंदर अर्थ नावाचं
मनाला भावे गिरिजात्मज महाराज

माता पार्वतीने पूजले तुला
पुत्र प्राप्तीसाठी मन एकचीत केले
ध्यान लाऊन तुला प्रसन्न केले
पुत्र रुपात मग प्राप्त केले

पाषाणावर कोरलेला तु देवा
शोभून दिसे रे गुफ्यात
हृदयात सगळ्यांचा घर तुझे
दिसे तु रे चरा-चरात

आकाशातून सूर्य दर्शनी तुझा येई
प्रकाशमय मंदिरास करी
शोभा वाढे मंदिराची
नाव साऱ्या विश्वात होई

भव्य तुझी शिला देवा
भव्य तुझे रे रूप
चहू दिशी फक्त तूच देवा
हृदयी ही वसला फक्त तूच

(शुभम सोनकुसरे)

Ganpati,ashtvinayak,lenyandri
गिरिजात्मज


Post a Comment

0 Comments