ते सुंदर जग म्हणजे आई असते

स्वामी तिन्ही जगाची आई विना भिकारी
उपकार तिचे इतके ना संपणार या जन्माशी
सर्वस्व आहे ती जगाची तिचा विना उपाशी
कर्तव्य तीचे सार शिकवते प्रतेक जन्माशी
असते ती उभी पाठीचा प्रतेक संकटाशी
आश्वासन तिचे पूराण कार्य आहे  हे महान
घडवते ती मुलास देऊन सत्याची शिकवन
गांजवते ती स्वतास भरवण्यास पिल्यास
विश्व तिच्यात दिसतं, नजर फक्त असावी स्वतात
मुलगा जरी झाला कपुत ना होत ती कुमाता
ममता होत कधी ना कमी सतत असते तिचात
उद्गारतो तीला तीचा पुत्र वेगवेगळया शंब्दात
कोणी म्हणतो तीला आई कोणी म्हणतो तीला माता
ना संपनारी व्याख्या ही कधी संपनार ना शंब्दात

(शुभम सोनकुसरे)





Post a Comment

0 Comments