गोष्ट एका भेटीची...

गोष्ट एका भेटीची...
अधीर हळव्या सांजेची,
त्याने नाइलाजाने उशिरा यावं,
कान पकडून तिला सॉरी म्हणावं,
तिने लटक्या रागानेच
मान मुरडून its ok म्हणावं,
तिचा हात पकडून त्याने चल म्हणावं,
तिने भारावून त्याच्यासवे निघावं,
सवयीची वाट तुडवत त्यांनी जावं,
वाटेवरच्या फुलांनी त्यांच उमलून स्वागत करावं,
ठरलेलं ठिकाण आल्यावर
एकमेकांकडे पाहून किंचित हसावं,
गर्दीपासून दूर
त्यांनी एकमेकात गुन्तावं,
तिने त्याच्या खांद्यावर डोक ठेवावं,
त्याने तिला स्वप्नांच्या नगरीत न्यावं,
दुनिया त्या दोघांची,
तिथे दुसरं नसावं,
स्वप्न दुनियेत स्वत:ला गुरफटून घ्यावं,
वेळेचं मग त्यांनी भान हरपावं,
दूर व्हायची वेळ आल्यावर,
एकरूप मन भरून यावं,
तिने हलकेच मान उचलून
त्याच्या डोळ्यात पहावं,
त्याचा डोळ्यांच्या कडेलाही
मग पाणी तळावं,
"उद्या भेटूया ना रे परत",
तिने कानात त्याच्या विचारवं,
त्याने फक्त हसून
तिच्या कडे डोळे भरून बघत रहाव...

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments