माझी विठू माऊली.....

भरुन आले हे उर घेऊन दर्शन तुझे रे देवा
बघतोस नेहमी आमचाकडे असते तुझीच कृपा
येतो या धरेवर देण्यास शिकवण या मनुषा
हरतो सगळ्यांचे दुःख ठेवतो सुखात प्रतेक जीवा!!

देऊन त्रास तु घेतो सगळ्यांची परीक्षा
नेहमी उभा असतोस पाठीशी आमचा तु देवा
सावळा दिसुन मोहतो सगळ्यांना एका तु क्षणा
वाटेवर कोणी भटकतो देतो त्यांना तु दिशा
आणून वाटेवर करतो उद्धार त्यांचा तु देवा!!

रडनाऱ्याचे अश्रू तु पुसतो हसनाऱ्यास हसवतो
देतोस फळ तु सगळ्याना करनीच्या हिशोबा
कोणी नाही तुझवर तुच सगळ्यानचा वर
सहजतेने चालवतो या सृष्टिस तु रे देवा!!

मानतो तुला आम्ही आई तुच आमचा रे बाप
म्हणतो तुला विठू माऊली
आणि तुच आमचा जगननाथ
वेगवेगळे तुझे रूप पण तु फक्त एकच!!

उद्धार तु या जीवाचा
वाट आमची तुझवर येऊन
जशी मीळते नदी सागरात
तशेच हे प्राण पुण्याने तुझात होतात एकरूप
पायाशी तु राहुदे सतबुद्धीचा वरदान
होऊदे रे देवा आता जीवनाचा आमचा या उद्धार!!

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments