गुरु विना ज्ञान नाही.....

गुरू विना ज्ञान नाही गुरू विना ना कर्म
मोक्षाचा पाया गुरू
गुरू नसेल तर मिळे ना मोक्ष!!

अज्ञानीला ज्ञान देई
ज्ञानीला देई तो मार्ग
सर्वस्व आपल शिष्याला देई
हा एकच त्याचा धर्म!!

चुकल्यावर रागवणार गुरू
यशावर पाठ थोपटनारा गुरू
आयुष्य घडवणारा असतो तो गुरू!!

पहिली ती आई गुरू
दुसरे असतात ते बाबा
शिकवण देतो तो गुरू
जीवन जगण शिकवतो तो गुरू!!

कधी पडल प्रश्न जीवनी
उत्तर देखील देई तो गुरू
पदो पदी मार्गदर्शन तो करी
प्रश्नात ना शिष्याला तो ठेवी!!

अंधकार कधी पसरला
उजेड त्याचा ज्ञानाने येई
संपेल ना कधी शब्द हे माझे
गुणगान गुरूचे चालत राही
वंदन करतो मी सगळ्या गुरूचे
चरणी त्यांचा स्वर्गाचे सुख येई!!

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments