नागपंचमी.....

भार तुझ्यावर दुनियेचा शेतकरीचा तु मित्र
असतो सदैव गळ्यात देवाचा
कधी करावतो विश्राम स्वतःवर देवाला

आहे तुला अमरत्व वय तुझी अफाट
करतो धनाचे रक्षण तु
मानव पुजतो तुला आजचा दिवसात

गड तुझे नागद्वार विराजतो तु शानात
श्रद्धालु येतात दर्शनासाठी गातात गान जोमात
रक्षण स्वतःच करण्यात सक्षम तु प्रत्येक क्षणात
उपयोगी तु मानवाचा दिशा तुझी निघते यशात

बळ तुझ्यात जगाचे झेलतो पृथ्वी डोक्यावर
हरतो संकट जगाचे जगतो तु प्रत्येकात

पूजा तुझी पावते महादेवाला
होतो प्रसन्न देवा दी देव
उभा होतो तु पाठीशी हरतो बघून भयं तुला

नारायणाची गादी तु
देवाची माझ्या सावली तु
पुजतो मी ही आज रे तुला
अर्पण करतो सर्वस्व तुला
पाजतो मी दूध श्रध्देने
मान माझा तुझा भक्तीने

हर हर महादेव
नागद्वार स्वामी प्रसन्न हो!!

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments