श्रावण.....

हिरवळ चहू दिशी पसरली वर्षाव त्यात भक्तीचा झाला
श्रावणाची रेशिमधारा घेऊन महाकाल धरेवर आला
हृदय हरश्र्ले उर गदगदले प्रचार स्वाभिमानावर झाला
राग शांतीचे स्वर सुहाने आत्मा भक्तिमय
जीवन शिवमय सगळ्यांचा झाला
जयघोष फक्त महादेवाचा झाला श्रावण फुल फुलूनी आला!

भस्म रमवली बेल पत्र चढवली ,शृंगार अतिशय देखणा झाला
बघून देवाला जीव नजरा एकत्रित झाल्या
दर्शन प्रेमाला भक्तीचा आला
जल्लोष मग सणाचा झाला श्रावण धारा धरेवर आल्या
हर हर महादेव गर्जना झाल्या श्रावण धारा धरेवर आल्या!

श्वासाचा हवेत ही शिव भक्ती
त्याचा मायेची अलौकिक शक्ती
संकटात देतो सगळ्यांना बळ
कष्टाचं नेहमी देतो तो फळ
मनो कामना पूर्ण तो करतो
भक्ताचा हृदई शिव वसतो!

पावन दिवसाचं करूया स्वागत
मना भावाने शिवाचे करूया पूजन
गाऊया मिळून एकच राग
हर हर महादेव!

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments