रक्षाबंधन.....

रेशमाची प्रीत तुझी गोडवा तुझा प्रेमात
गाठ बांधून रेशमाची देतो तुला वचन
मरण्या परी ही असणार आपल हे बंधन
सदा साथ देणार तुझी नाही घेणार माघार

प्रिय तू बहीण माझी मी तुझा भाऊ ग
हसत खेळत जगू जिंकू प्रत्येक दुःखात
सुखद सार जीवन काढू नसेल कसला रुसवा ग
हाथ ठेऊन डोक्यावर दे तू मला आशिष
हार कधी ना होणार माझी जिंकत राहणार जीवनात

प्रेमळ तुझी बोली ताई प्रेमळ तुझे वचन
ऐकुन होते तृप्त मन गोडवा येतो जगण्यात
राहणार ना कधी दुःख कोणत तू जर राहशील हसत
हसणार मी ही बघून तुला माझा सवे हसणार सार हे जग
हसणार हे जग सुंदर तर हसणार तो परमेश्वर

दिवस आज हा आपला आहे सुंदर या दिवसाची पहाट
बांधून मला रेशीम धागा घे माझा कडून वचन
घेऊन माझं वचन दे तूही मला वचन
रुसवा ना धरशील कधी नेहमी अशिल सोबत
पुशील माझे डोळे नेहमी थोपटशिल माझी पाठ
पडलो जर कधी कुठे उचलशील देऊन तुझा हाथ
(शुभम सोनकुसरे)





Post a Comment

0 Comments