थेऊरचा गणपती (अष्टविनायक -५)

देवा प्रकटला थेऊर गावात
टेकून बसला कदंब वृक्षास
नाव पडलं त्याच चिंतामणी
प्रत्येकाची चिंता तो क्षणात हरी!!

देव माझा दिसे किती भोळा
भक्तांचा लागे मोठा ताथा
नजर असे त्याची प्रत्येक जना
काढे संकटातून तो लोकां!!

डाव्या सोंडेचा इथला गजानन
पूर्वाभिमुख मूर्ती शोभे देवालयात
भक्तांची भाउक्ता सदैव वाढवे
प्रेमात भक्तांना देव पाडे!!

पेशव्यांनी बनवल सुंदर मंदिर
होते ते मोठे गणेश भक्त
विस्तार केला मंदिराचा माधवरावांनी
निधन त्यांच झाल त्याच स्थानी!!

समाधी आहे इथे रमाबाईची
गाथा त्यांचा अनोख्या प्रेमाची
पुणे सोलापूर मार्गास आहे मंदिर
शोभा त्याची पूर्ण देशी!!

(शुभम सोनकुसरे)

गणपती,थेऊर,चिंतामणी,अष्टविनायक
चिंतामणी थेऊर

Post a Comment

0 Comments