महाडचा गणपती (अष्टविनायक -४)

महाडचा आहे गणपती वरदविनायक
नवसाला पावतो इथला गणपती गजानन
पुत्र प्राप्तीचा वर तो देतो भक्ताची इच्छा पूर्ण करतो.

कौन्डीन्यपूरचा सम्राट भिमला पुत्र दिले
एकाक्षर गणेश मंत्राला फळ आले
रुक्मंद नावाचा सुपुत्र राणीला झाला
राजाचा घरी अंश आला पूर्ण राज्यात जालोष झाला.

राजकुमार लवकर मोठा झाला शिकारास जंगलात गेला
ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात राहिला
ऋषीची पत्नी राजकुमारावर मोहित झाली
राजकुमाराने तिचा प्रेमाला नकार दिला.

इंद्र तिच्यावर मोहित झाला राजकुमाराचा वेश धरून आला
मुलाला हे जेव्हा कडले आपल्या आईनी दुष्कर्म केले
त्याने आईचा परित्याग केला पुष्पक अरण्यात गेला
गणेशाची तपस्या केली देव प्रसन्न त्याचावर झाला.

त्याने ब्रम्ह ज्ञान देण्यास देवाला प्रार्थना केली
धाडशी पुत्राचा वर मागितला
देवाने इच्छुक वर त्याला दिले
इथेच स्थापित होण्यास देवाला आग्रह केला
देव तिथेच स्थापित झाला.

ग्रीत्सम्दने मंदिर तिथे उभारले
देव वरदविनायक नावाने प्रसिद्ध झाला !!!

(शुभम सोनकुसरे)

अष्टविनायक,वरदविनायक,गणपतीबाप्पा
महाडचा गणपती वरदविनायक


Post a Comment

0 Comments