पालीचा गणपती (अष्टविनायक -३)

 रायगडाचा पालीत प्रकटला बल्लाळेश्वर

भक्ताचा नावावर झालं नाम करण

अतिशय देखणा इथला गजानन

बघण्यास भक्त येतात धाऊन!!


बल्लाळ होता असीम गणेश भक्त

कल्याण व्यापाराचा होता तो पुत्र

आई होती त्याची इंदुमती

गणेशमूर्ती पूजनाची होती त्याला ओढ!!


सवंगडीला सोबत घेऊनी करी तो भजन

गणेश पूजनात दिवसभर सारे रमत

सगळ्यांना वाटे मुले संगतीने त्याचा बिघडली

कल्यानांना केली बल्लाळची तक्रार!!


रागात येऊन कल्याण गेले रानात

तिथे सगळे रमले होते भक्तीत 

बघून ते कल्याणांना चढला फार राग 

बल्लाळला उधळून काढले त्यांने फार!!


बल्लाळ पडला बेशुद्ध बांधून ठेवले त्याला वृषास

शुद्धीत आल्यावर त्याने केले गणेशाचे आव्हाहन

देव प्रकटला ब्राम्हण रुपात तुटले सारे त्याचे बंधन

बल्लाळ मुक्त झाला दुःखातून!!


देवाने वर मागण्याचा केला आग्रह  

त्याने तिथेच स्थापित होण्याचा मागितला वर 

तिथेच झाला स्थापित गजानन नाव पडले बल्लाळेश्वर!!


(शुभम सोनकुसरे)





Post a Comment

0 Comments