कृष्ण जन्माषटमी.....

कृष्ण पक्षात तो जन्मला वादळ वारा सवे घेऊन आला,

तुरुंगाचा अंधारात जसा दिवा प्रकाशमय झाला.

अष्टमीची तिथी होती सुखमय तो दिवस होता,

अंधारलेली रात्र होती काठीन तो वेळ होता,

पालनहाराचा जन्माचा सगळ्यांना लागलेला ध्यास होता.


जन्म झाला प्रकाश आला चहू दिशी उत्सव झाला,

यमुनेच्या उफान ही पायाचा स्पर्शाने कमी झाला.

धर्म संस्थापनेसाठी कान्हा गोकुळात आला,

यशोदेचा तो लाल झाला, बाबा नंदच्या घरी अंश आला.

गोकुळात ही जयघोष झाला वातावरणात आनंद आला.


हळू हळू कान्हा मोठा झाला, खूपच तो खट्याळ झाला.

लोण्याचा चोरी साठी वेगवेगळे डाव रचू लागला,

खोड्या गोप्यांचा करू लागला,वस्त्र लपवणे

मटकी फोडणे,रस्ता अडविणे,जाळ्यात फासने

नित्य नवीन करस्तान रोज करू लागला.

क्रीडा प्रेमाचा दाखऊ लागला,

प्रेमात सगळ्यांना पाडू लागला.


रास करण्यासाठी तो राधा सोबत यमुनेकाठी भेटत होता.

प्रेमात तो राधेचा दिवस रात्र विसरत होता.

अध्याय प्रेमाचा कृष्ण होता,सार अध्यायाची राधा.

अपुरे ते होते एकमेका विना पूर्ण होत ते प्रेम.

शिकवण्यासाठी प्रेम धरेवर अवतरले ते थेट.


धर्म स्थापनेसाठी अर्जुनाचा रथ वाहक झाला,

नाश करून अधर्माच धर्म त्याने स्थापन केला.

ध्येयपूरती करून वयकुंठात तो स्थापित मग झाला.

कृष्ण अवतारात सगळ्यांना मानवतेचा मार्ग दाखविला...


(शुभम सोनकुसरे)





Post a Comment

0 Comments