गणेश स्थापना.....

 आस तुझी या लागे जिवा भास तुझा रे चहू दिशा

भक्तांच्या भक्तिचा राजा असा आमचा तु गणपती राया...


पहिली पूजा तुलाच पावे प्रेमानी सगळे आरती गावे

मोदकाचा तुला भोग ही लावे चरणी तुझा शिष नमावे...


पीतांबर तुझ्यावर अतिशय शोभे भक्तांचा हृदयास भेदे

शंक परसा धारण तु करे संकटात आमचा पाठीशी असे...


मुशकराजं नेहमी सोबत दिसे इथे तिथे तुला मिरवत असे

प्रेमाचा सुंदर संबंध दिसे अशी प्रितीमय भक्ती असे...


सगळ्या नजरा तुझ्यावर अडल्या आगमनास जीव आतुरला

भाव भावना सगळ्या कोसळल्या नयनी फक्त तूच वसला...


ढोल ताशांच्या आवाज ही गडगडला नजरेतून तु हृदयी उतरला

भक्तिचा सगळी कडे सागर झाला आगमन होऊन तु जेव्हा बाप्पा घरी आला...


सुखमय हे वातावरण झाले श्रावण समाप्तीस बाप्पा आले

जलोष सर्व दिशी झाले प्रेमाचे जागो जागी सयलाब आले

बघून तुला मन प्रफुल्लित झाले भक्तीला माझा पावन फळ आले.....

(शुभम सोनकुसरे)




Post a Comment

0 Comments