मोरगावचा गणपती (अष्टविनायक - १)

देवा तुझी महिमा महान सगळ्यांना दाखवतो चमत्कार
भल्याभल्यांना होतो आश्चर्य करतो तुझी रे स्तुती गावात!!

अष्टविनायक महाराष्ट्रची शान मोठी त्याची महिमा महान
आज करतो मी त्याची स्तुती त्याचा चरणी ठेऊन मस्तिष्क!!

पहिला गणपती मोरेश्वर ,
मोरावर बसुन केला दैत्य संहार
कान्हा नदी काठी वसले ते गाव नाव पडल त्याच मोरगाव!!

होते सुरू दर्शन तिथून अष्टविनायक ,
अतिशय शोभतो मयुरेश्वर
मंदिर दिसतो फार सुंदर मन मोहतो प्रेतेका एका जन!!

सुभेदार गोळेनी केला मंदिराचा जिर्णोद्धार , 
नक्षीदार झालं सुंदर काम
होऊ नये मुघल आक्रमण मजि़दी सारखा दिला आकार मंदिरास!!

आदिलशाही कालखंडात फडकवला त्यांनी ध्वज ,
मान वाढला भगव्याचा त्या कालखंडात
घडवला त्यांने इतिहास मंदिर बांधून मुघल काळात!!

देवाचा नजरेत चमके हिरे ,
कपाळी शोभे नागराज
गाभाऱ्यात बसला मोरेश्वर डाव्या बाजूस वडवली त्याने सोंड!!

बघतो पूर्वेस अती सुंदर आकर्षित करतो प्रत्येका जन  
सुरू होई दर्शन अष्टविनायक यात्रा होई फार सुखद!!

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments