सिध्दटेकचा गणपती (अष्टविनायक - २)

सिध्दटेकेत आहे देव सिध्देश्वर

उजव्या सोंडेचा आहे एकमेव मंदिर

विष्णु देवांनी केली त्यांचा कडून सिद्धी प्राप्त

वध केला मग मधू व कैटव


होतात प्रेतेकाच कार्य इथे येऊन सिद्ध

आहे देव इथला सिध्देश्वर

अहिल्या बाईंनी केला जीर्णोद्धार

शोभून उठला माझा देव गणराय


पेशवे कालीन महत्व लाभलेलं हे मंदिर

आहे पाषाणाच्या सिंहासनावर देव विराजमान

सरदार हरिपंत फडके यांनी केला मार्ग निर्माण

भीमा नदी वाहते मंदिराचा परिसरात


एक मांडी घालून बसला गजानन

आहे त्यावर रिद्धी सिद्धी विराजमान

उत्तरे कडे बघतो देव इथला

प्रभावळीवर इथल्या आहे सूर्य चंद्राचा आकृत्या

मध्य भागात आहे नागराज


पूर्ण होते इथे येऊन अष्टविनायकाचा दुसरा पडावं

भक्तिचा होतो उद्धार


(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments